सोमवार, २६ जुलै, २०१०

भारताचे पहिलेच वेब ब्राऊझर 'एपिक'भारताचे पहिलेच वेब ब्राऊझर 'एपिक'
पीटीआय
Thursday, July 15, 2010 AT 05:10 PM (IST)
http://72.78.249.126/esakal/20100715/images/5512534837543362024/5503528024153076124_Org.png
बंगळूर - ग्राहकाभिमुख 'हिडन रिफ्लेक्स' या सॉफ्टवेअर कंपनीने देशातील पहिल्याच 'वेब ब्राऊझर'ची आज (गुरुवारी) सादर करण्यात आहे. या 'ब्राऊझर'ला 'एपिक' असे नाव देण्यात आले असून, त्यात मोफत 'अँटी व्हायरस स्कॅनिंग अँड हीलिंग'ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

'एपिक' सादर करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक आलोक भारद्वाज म्हणाले, की या 'ब्राऊझर'मध्ये भारतीय संस्कृतीचे निदर्शक असलेले आणि स्वातंत्र्यसैनिकांपासून चित्रपट अभिनेत्यांपर्यंतचे १५०० 'थीम्स' आणि 'वॉलपेपर्स' आहेत. भारतीय सॉफ्टवेअर तंत्रज्ञांनी खुल्या 'मोझिला' या प्रसिद्ध 'ब्राऊझर'ने जगभरातील तंत्रज्ञांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधेचा वापर केला आहे.

भारद्वाज म्हणाले, की खास भारतीय वातावरणाचा आभास निर्माण व्हावा, अशा पद्धतीने हे 'ब्राऊझर' विकसित करण्यात आले आहे. त्याच्या डाव्या भागात भारतीय विषयांची रेलचेल आहे. वापरकर्त्याला प्रमुख वृत्तपत्रांतील ताज्या राष्ट्रीय आणि स्थानिक बातम्या, थेट दूरचित्रवाणी वाहिन्या, व्हीडिओ, शेअर बाजारातील हालचाली, क्रिकेट सामन्यांचा ताजा धावफलक, संगीत आणि स्थानिक कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून १२ तंत्रज्ञांचा एक खास गट, या प्रकल्पावर काम करत होता. अंतर्भूत करण्यात आलेल्या 'अँटिव्हायरस'मुळे ग्राहकांना महागडे सॉफ्टवेअर खरेदी करण्याची आवश्यकता राहिलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
 
अस्सल भारतीय 'ब्राऊझर'

१. अंतर्भूत अँटिव्हायरस! 'ई-सेट अँटिव्हायरस' स्पायवेअर आणि स्पॅमसाठी पीसी/फोल्डर स्कॅन करण्याची सुविधा
२. कोणत्याही संकेतस्थळावर न जाता आयबीएन लाईव्ह, एनडीटीव्ही, रीडीफ यांच्यावरील बातम्या ब्राऊझरच्याच डाव्या भागातून पाहण्याची सोय
३. भारतीय भाषांसाठी स्वतंत्र टायपिंगची सोय. त्यासाठी नव्या सॉप्टवेअरची आवश्यकता नाही. अक्षरांच्या सजावटीसाठी 'रायटर' हा नवा एडिटर आहे
४. रोजच्या वापरातील 'फेसबुक', 'ट्विटर', 'ऑर्कुट', 'जी-मेल', याहू-मेल यासारखी रोजच्या वापरातील सोशल नेटवर्किंग ब्राऊझरमधील बारमध्ये चालू ठेवता येणार
५. दिवसभरातील कामाच्या नोदींसाठी 'टु डू', 'टायमर', 'अलार्म', 'युट्यूब', 'गूगल मॅप्स', नोकरी, प्रवास, 'गेम्स' आणि काही 'डेटा बॅक-अप' एका क्लिकवर उपलब्ध
६. 'स्निपेट्स'मध्ये कामाशी संबंधित मजकूर ठेवता येणार
७. 'फायरफॉक्स'च्या सर्व सुविधा उपलब्ध. त्याशिवाय 'बॅकग्राऊंड ग्राफिक्स/फोटो'ही ठेवता येणार
 
सुविधा

१. फाईल बॅक-अप ही उपयुक्त सुविधा. गुगल डॉक्सवर फाईल्स अपलोड करता येणे शक्य
२. 'एपिक अ‍ॅप्स'मध्ये असलेल्या 'गेम्स'मुळे, कामातून मिळणा-या मोकळ्या वेळेत एखादा लहान गेम खेळ खेळता येणार
३. शॉपिंग, स्कायमॉल, डेल अशा डिपार्ट्समेंट्सवर चालू असलेल्या खरेदीच्या ऑफर्स पटकन पाहता येणार
४. 'सोशल नेटवर्किंग'अंतर्गत 'आइबिबो', 'ब्लॉगअड्डा'पासून 'ट्विटर'ची विविध अप्लिकेशन्स. 'पिकासा'पासून 'फ्लिकर'पर्यंतचे फोटो साईट आणि 'जी-टॉक'पासून याहूपर्यंत सर्व मेसेंजर्स उपलब्ध
५. एकूण १२ भारतीय भाषांमध्ये टायपिंगची सोय

मला इथे भेटा : purandarchawaghsardar.blogspot.com