गुरुवार, ८ जुलै, २०१०

नवा ब्रिटिश कायदा

चमत्कारी बाबा, मांत्रिक, ज्योतिषी आणि इतर मार्गाने भविष्य सांगण्याचा दावा करणार्‍यांचे भाकित जर खरे ठरले नाही तर त्यांना कोर्टात खेचता येणे आता ब्रिटनमध्ये शक्य होईल. लवकरच येणार्‍या नव्या ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींमुळे हे शक्य होईल.

ब्रिटनच्या 'स्पिरिच्युयल इंडस्ट्री' मधील मांत्रिक/ज्योतिष्यांचे उत्पन्न प्रतिवर्षी ४०मिलियन पाउंडच्या घरात जाते.
नव्या नियमांनुसार भविष्य सांगणारे, ज्योतिषी यांना आपल्या सेवा ह्या "फक्त करमणुकीसाठी" (entertainment only) आहेत आणि "प्रयोगाने सिद्ध झालेल्या नाहीत" (not experimentally proven) असे स्पष्ट करणे बंधनकारक आहे.
जर आपल्या व्यवसायाचे "फक्त करमणुकीसाठी" असे स्वरूप आधीच स्पष्ट केले नाही तर ज्योतिष्यांना कोर्टात खेचून तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.
भारतातून किंवा इतर देशांतून फिरतीवर येणार्‍या मांत्रिक/ज्योतिष्यांनाही हा कायदा लागू आहे.
युरोपियन युनियन मधील देशांमध्ये असा कायदा आधीपासूनच आहे.
अधिक माहिती

१. Soothsayers face the heat in UK - Times of India
२. Consumer net tightens on rogue traders - The Herald
३. Asian Rationalist Society (Britain)