मंगळवार, २७ जुलै, २०१०

इंटरनेट एक्सप्लोरर Internet Explorer मधल्या छुप्या गॊष्टी !

इंटरनेट वापरण्यासाठी म्हणजेच वेबसाईट पाहण्यासाठी आपण इंटरनेट एक्सप्लोररचा वापर करतो. अशा सॉफ्टवेअर्सना 'ब्राऊझर' [Browser] असे म्हणतात. सध्या बरेच मोफत 'ब्राऊझर' मिळतात. जसे फायरफॉक्स, ऑपेरा, नेटस्केप इ. परंतु तरीही शक्यतॊ 'इंटरनेट एक्सप्लोरर' हा ब्राऊझर वेबसाईट पाहण्यासाठी जास्त वापरला जातॊ. 
'इंटरनेट एक्सप्लोरर' मध्ये काही उपयोगाच्या गॊष्टी आहेत ज्या काम करताना उपयॊगी पडू शकतात. 
१. फुलस्क्रिन Full Screen - इंटरनेट एक्सप्लोररमध्ये वेबसाईट पाहताना कि-बोर्डवरील 'F11' हे बटण दाबल्यास इतर सर्व मेनूबार लपले जातात व आपण पाहत असलेली वेबसाईटच संपूर्ण स्क्रिनभर दिसते. पुन्हा पूर्ववत व्यवस्थित करण्यासाठी 'F11' दाबावे. 
२. वेबसाईट पाहताना - शक्यतो सर्वच वेबसाईट शेवटी '.com' नावाच्या असतात. त्यामूळे एखादी वेबसाईट पाहताना आपण सुरुवातीला 'www' आणि शेवटी '.com' टाईप करतो. म्हणजेच www.rediff.com वेबसाईट पाहताना आपण ते नाव संपूर्ण टाईप करतो. त्याएवजी 'इंटरनेट एक्सप्लोरर' मध्ये फक्त ' rediff ' टाईप करुन कि-बोर्ड वरील कंट्रोल बटण दाबून एंटर ( Ctrl + Enter ) दाबल्यास तीथे आपोआप ' www.rediff.com ' येते.
३. आवडत्या वेबसाईट्सची यादी 'Favorites' - एखादी वेबसाईट चांगली वाटली तर तिचे नाव संग्रही लिहून ठेवण्यासाठी हा विभाग उपयोगी पडतॊ. आपण जी वेबसाईट पाहत असाल ती जर तुम्हाला तुमच्या आवडत्या वेबसाईट्सच्या यादीमध्ये नोंदवायची असल्यास कि-बोर्डवरील 'Ctrl + D' (कंट्रोलचे बटण दाबून 'D' हे बटण दाबावे) बटण दाबल्यास कॉम्प्युटर आपणास ती संग्रही म्हणजेच 'Favorites' मध्ये साठवायची आहे का? असे विचारतो. इथे वेबसाईट नोंदविताना ती एखादा फोल्डर बनवून त्यामध्ये देखिल साठविण्याची सोय आहे. 'New Folder' वर क्लिक केल्यास त्याला नाव देऊन 'OK' केल्यास ती वेबसाईट त्या फोल्डर मध्ये नोंदविली जाते. 
अशा प्रकारे नोंदविलेली वेबसाईट पुन्हा पाहण्यासाठी ब्राऊझर मधील वरील मेनूबारमधील 'Favorites' ह्या विभागामध्ये क्लिक केल्यास आपणास याआधी नोंदविलेल्या सर्व वेबसाईट्सची यादी मिळते. त्यातील आपणास हव्या असलेल्या वेबसाईटवर क्लिक केल्यास ती वेबसाईट सुरु होईल. 
४. वेबसाईटमधिल फॉन्टचा आकार वाढविणे - काही वेबसाईट वरील फॉन्टचा आकार फारच कमी असतो. अशा वेळी त्यावरील मजकूर वाचायला त्रास होतो. अशा वेळेस कि-बोर्डवरील 'Ctrl' (कंट्रोलचे बटण) दाबून ठेवून आपल्या हातातील माऊसवरील मधले गोल 'स्क्रोल'चे बटण फिरविल्यास चालू वेबसाईटवरील मजकूराचा फॉन्ट लहान अथवा मोठा होतो. आपल्या सोयीनूसार 'स्क्रोलचे' बटण फिरवून आपणास हवी असलेली फॉन्टची साईझ ठेवावी. 
५. वेगळी वेबसाईट पाहताना - एखादी वेबसाईट पाहिल्यानंतर दुसरी वेबसाईट पाहण्याकरीता आपण 'Address Bar' वर म्हणजेच जेथे आपण वेबसाईटचे नाव टाईप करतो तेथेच क्लिक करुन नवीन वेबसाईटचे नाव टाईप करतो. अशाप्रकारे 'Address Bar' वर क्लिक करण्याऎवजी कि-बोर्डवरील 'F6' अथवा 'F4' बटण दाबल्यास कर्सर लगेच 'Address Bar' वर जातो