सोमवार, २ ऑगस्ट, २०१०

मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग

मोडीलिपी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग होणार 
आहेत. तज्ञ शिक्षकांकडून मोडी लिपीविषयी मार्गदर्शन केले जाईल. ऐतिहासिक 
कागदपत्रे, शिलालेख, शकावली इत्यादी दस्तएवजाच्या अभ्यासासाठी मोडी लिपीचा 
उपयोग होतो.

            हे वर्ग दादर येथील राजा शिवाजी विद्यालयात २४ एप्रिल पासून दर
शनिवारी संध्यकाळी ५ ते ७, तर ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूल येथे २५ 
एप्रिल पासून दर रविवारी सकाळी ९ ते ११ यावेळेत वर्ग घेण्यात येणार आहेत.संपर्क :  २५११९८९६
--