सोमवार, २ ऑगस्ट, २०१०

बायको जेंव्हा बोलत असते


बायको जेंव्हा बोलत असते तेंव्हा ऐकून घ्यायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!
भडका असतो उडालेला अनावर असतो रोष
वाभाडे काढत आपले ती सांगत असते दोष
आपले दोषआपल्या चुका सारं सारं...स्वीकारायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!
शब्दानं शब्द वाढत जातो भडकत जातो तंटा
म्हणून वेळीच ओळखायची असते आपण धोक्याची घंटा
समोरची तोफ बरसली तरी
आपण...
तोंड उघडायचं नसतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!
गरजून बरसून झाल्यानंतर थकून जाते बायको
आग पाखडून झाल्यानंतर शांतही होते बायको
अशाच वेळी विसरून सारं
तिला...
जवळ घ्यायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!
तिची चिडचिडतिचा संताप प्रेमच असतं हेही
तिची बडबडतिची कडकड प्रेमच असतं तेही
तिचं प्रेम तिनं करावं
आपलं....
आपण करायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

कोण म्हणतं आमच्या घरात

कोण म्हणतं आमच्या घरात माझं काही चालत नाही?गरम पाणी मिळाल्याशिवाय मी भांड्यांना हात लावत नाही!
तसे घरातले सगळेच निर्णय बायको माझ्यावरच सोपवते
धुणं केंव्हाभांडी केंव्हा माझं मला ठरवू देते!
मीही माझ्या स्वातंत्र्याचा पुरेपुर फायदा घेतो
आधी स्वैपाक करून घेतो धुणं भांडी मागून करतो...
रहाता राहिली केर-फरशी आणि आवरा आवर
तेही पटापट करून टाकतो बाकीची कामं झाल्यावर...
आता विचाराल 'तुमची बायको घरात काहीच काम करत नाही?'अहोअसं काय करता ती माझ्यापासून स्वतःला वेगळं सं धरत नाही!
तिनं केलं कायमी केलं काय सगळं एकच असतं
दोघांत भेद करायला जातं तिथेच जग फसतं!!

बायको नावाचं वादळ

तुम्ही घरात शिरता तेंव्हा सारं शांत शांत असतं
चपला जागेवरपेपर टिपॉयवर सारं जागच्या जागी असतं
सोफ्यावरती बसून राहून हातामधे रिमोट घेऊन
बायको नावाचं वादळ पहात असत तुमची वाट

घरामधे तू ससा

सिंह जरी तू जगतासाठी घरामधे तू ससा
हीच कहाणी तुझी मानवा हाय असा तू कसा!
तुझ्या आरोळ्या डरकाळ्यांनी दुमदुमते तारांगण
तुझी कर्तबे पाहुन होते अचंबित तारांगण
घरात येता कशास होतो तुझा कोरडा घसा!!हीच कहाणी तुझी मानवा हाय असा तू कसा!
जशी एकदा चढते तुझिया अंगावरती लुंगी
उतरुन जाती शस्त्रे सारी सिंह बनतसे मुंगी...
कशास ऐसा आक्रमणाचा सोडुन देशी वसा...
हीच कहाणी तुझी मानवा हाय असा तू कसा!