बुधवार, २२ सप्टेंबर, २०१०

प्रेमाची एक गम्मत असते.....!

सुरूवात त्याची डोळ्यांनी होते 
मग ते हृदयापर्यंत जाऊन पोहोचते
आधी नाही-नाही नंतर हो हे उत्तर असते 
प्रेमाची हि एक गम्मत असते..... 

डोळ्यांनी जे म्हटलं ते ओठांवर यायला उशीर होतो
दिलीच साथ ओठांनी तर आपण नेमके दुसरे बोलतो 
मग त्रास हा त्याचा नेमका आपण करून घेतो 
प्रेमात सर्वांचे हे असेच होते 
कारण, प्रेमाची एक गम्मत असते..... 

मन आधी धावते ते मिळवायला 
मिळाले कि वेळ द्यावा लागतो ते सांभाळायला 
मन हे मग आपले राहत नाही 
लक्ष तर कुठेच लागत नाही
नजरेसमोर मग ती नेहमीच असते 
प्रेमाची हिच तर गम्मत असते.....

भटकलेला एखादा इथेच स्थिर होऊन जातो 
मिळता प्रेम तो इथला वीर होऊन जातो 
वीर झाले तरी इथे नमते घ्यावे लागते 
रुसलीच तर तिला प्रेमाने समजवावे लागते 
कारण, प्रेमाची एक गम्मत असते.....

नुस्तच ठरवून कधी प्रेम होत नाही 
डोळे जरी खूप बोलत असले,
तरी न बोलता कधी प्रेम मिळत नाही 
मनातले प्रेम कधी मनात ठेवायचे नसते
वेळ जाण्याआधी सर्व काही तिला सांगायचे असते
कारण, प्रेमाची एक वेगळीच गम्मत असते.....

न सांगता मग कुढत बसायचे नसते 
’आणि गेली ती’..... म्हणत रडत बसायचे नसते 
गळला पान आयुष्याचा एक, तर ते पकडायचे नसते 
नव्या मोहराची वाट पहायची असते 
पालवी फुटतेय तर त्याला फुटू द्यायची असते 
कारण प्रेमातच खरी गम्मत असते......