शनिवार, ७ मे, २०१६

बहिणीने भावाच्या लग्नात आईस दिलेले पत्र .........

बहिणीने भावाच्या लग्नात आईस दिलेले पत्र ......... 
आई तु जेंव्हा सासु होशील तेंव्हा सुने मधे मलाच बघ.तुझीच लेक समजून तिला सासरीच माहेरच दर्शन दे.हसत खेळत तीला आपलस करून घे. 

नको करू तिचा तिरस्कार; तिच्या मनात राहिल तेढ.मायलेकि म्हणून जगा , करा एकमेकींना प्रेम. 

उठता बसता खेकसायच, जणू सगळं काही तुला च ज्ञात.पावलो पावली तिचा अपमान करून, जमेल तिथ खोटं बोलून स्वत:ला क्रेडिट घेशील मात्र तिच्या मनातुन उतरशील.कारण तिच तुझ्या जवळ शेवटपर्यंत असेल.याची जान ठेव. 

तु सगळ्यात एक्सपर्ट आहेस याची मला जाण आहे.पण कौतुक करायला सुनेचही तु कधी विसरू नकोस.तिने केलेल्या चुकीवर पांघरून घाल म्हणत नाही पण त्या जागी मी आहे हे कधी विसरू नको. 

हसत हसत तिला तिच्या संसारात रमू दे.तिच्या भावना दुखावतील अस कठीण वागू नको.तिच्या किरकोळ तक्रारींच डोंगर मात्र करू नको.धाक हवा घरात तुझाही पण; ती शत्रु नाही लक्षात ठेव. 

मला जशी तुझी आठवण येते तुला भेटावे वाटते.तशी तीलाही माहेरी जाव वाटणार.वेळोवेळी जाऊ दे तिला सासरची उबग नाही येणार. 

आणखी एक गोष्ट सांगते आई राग नको मानू.माझ्या आजारपणात तु माझी सेवा जशी केली.तशीच सेवा तु तिच्या आजारपणात, गरोदरपणात कर.बाळंतपणा नंतर तिची खुप काळजी घे.कंटाळा करून तिच्या मनात सल ठेवू नको. 

'मीपणा' मध्ये जीवन व्यर्थ घालवू नको.रूसवे फुगवे करून तिच्या वर काही लादु नको 

तिला मुलबाळ झाल्यावर तिला तुझी गरज असेल.तुही त्या मुलाची आजी आहेस हे तु विसरू नकोस.नातवंडाची शी शू काढताना कधीच घा..ण म्हणू नकोस.भरपूर प्रेम दे त्याना आपल्याच तोर्यात मिरवू नको. 

हे माझ हे तीच अस कधीच म्हणू नको. 
ती तिच्या संसारात मग्न होईल यातच धन्यता मान. 
त्यांच्या संसारात जास्त ढवळाढवळ करू नको.त्यांच्या मनात अशी जागा मिळव की तु डिलीट झाल्यावरसुध्दा ती जागा तशीच राहिल. 
नातवंडांच्या आजारपणात तीला होईल ती मदत कर.त्यांच्या अडचणीत तु खंबीर उभी रहा.त्यांच ते काही का करेनात अस कधी म्हणू नको. 
लक्षात ठेव आई त्यांच्या संसारात तुझी जागा कायमच राहिल.पण जागा मिळवण्यासाठी तु कुरघोडी करू नको. 

पै पाहुण्यासमोर तीलाही मान मिळवून दे.बघ कशी धन्य पावशी सुन -मुलाच्या हृदयात रहाशील.तु तेव्हा खरी समंजस होशिल. 

नातवंडाच्या खेळण्याला दंगा म्हणू नकोस.खेळणी त्यांची कधी पसारा समजून अडगळीत टाकू नको.प्रत्येक घरात नातवंडं खेळतातच अस नाही.नातवंडं हवी म्हणून कित्येकजण नवस करतात बाई. 

म्हणून सांगते आई नव्या जुन्या पिढीमध्ये जुळवून घे.प्रेम दिल्याने वाढते हेच लक्षात ठेव. 

आई तु जेव्हा सासु होशील तेव्हा नव्याने आई होशील यावेळी मात्र तुला दोन दोन लेकी असतील. 

प्रत्येक मुलीने आपल्या आईस हे पत्र दिले तर सासु आणि नणंद या नात्याचे रूपांतर आई आणि बहिणी त होईल.